पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थरमॅक्स चौकातील थर्मॅक्स कंपनी लगत अनधिकृत बांधकाम, पत्राशेड यावर अतिक्रमण विरोधी पथकामार्फत फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत गुरुवारी (दि.२६ मे २०२२) रोजी निष्कासनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र या ठिकाणी बाबासाहेब गोविंद कांबळे यांची पत्रा शेड व महा-ई-सेवा केंद्र होते ते पालिकेने नोटीस न देता पाडल्याने आकुर्डी येथील मे. सिव्हील जज डिव्हिजन यांच्या कोर्टात दिवाणी दावा क्रमांक २७/२०२३ दाखल केला आहे. त्याला 18/03/2024 पर्यंत स्टे ऑर्डर देण्यात आली आहे. त्यावरती 10 एप्रिल 2024 तारखेला नव्याने यावरती सुनावणी होणार आहे.
याबाबत हकीकत अशी आहे की, 4 ऑक्टोबर 2010 रोजी वादी बाबासाहेब कांबळे यांच्या अजंठानगर समाजसेवा संघटनेला थरमॅक्स कंपनी भिती लगत सुशोभीकरण दत्तक विनामूल्य सांभाळण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने प्रस्ताव तयार केला व वाढीचा ताबा वहिवाट इतर व्यवसाय मिळकत या ठिकाणी होती असे कांबळे यांचे म्हणणे आहे. 30 9 2010 रोजी उद्यान विभागामार्फत वादी यांच्या संघटनेला मोजमाप व नकाशा तयार करून मिळकतीबाबत अहवाल ही सादर केला आहे. यावेळी रोड रस्ता जागेमध्ये एमएसईबी डीपी वादीच्या इतर व्यवसाय मिळकत ही रोड रस्त्यामध्ये येत नाही असा आराखडा तयार केला असल्याचे कांबळे यांनी दिवाने न्यायालयाच्या पत्रकात म्हणाले आहे.
यावरती महापालिकेने 9 मे 2022 रोजी विनापरवाना सीमांकन विकास आराखड्याचे नियोजन न करता रातोरात अनाधिकृत कच्चा पक्का रस्ता बनवून, वादीला नोटीस न देता, पंचनामा न करता, सदर जागा जमीन भूखंडामधील वादीची मिळकतीचे मोडतोड करून, बारा गाड्यांचे मटरेल प्रतिवादी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी जप्त केले आहे. ही बेकायदेशीर कारवाई केली. सदर जागेत वादी यांच्या कुटुंबाचा रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे असे न्यायालयाच्या दाव्यामध्ये म्हटले आहे.
निगडी भोसरी रोडवर थरमॅक्स कंपनी भिंती लगत काही जागा शिल्लक आहे. यावरती काही भागात महापालिकेने सुलभ शौचालय उभारले आहे. तर उर्वरित जागेवरती परिसरातील काही भाग महापालिकेने अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून मोकळी करत डांबरीकरण रस्ता बनवला आहे. अतिक्रमणा नंतर आकुर्डी येथील सिविल कोर्टात बाबासाहेब कांबळे आणि आयुक्त तथा प्रशासक पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यामध्ये 27/ 2023 दावा मिळकत प्रलंबित आहे. ताजा जागेवर वादी बाबासाहेब कांबळे यांचा ताबा वहिवाट व इतर व्यवसाय वर्षानुवर्ष होते असे त्यांचे म्हणणे आहे.

काय आहे बाबासाहेब कांबळे याचे म्हणणे…..
कांबळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मे.स्पेशल स्लम ट्रायब्युनल कोर्टाच्या व पुणे कोर्टाच्या आदेशानुसार मला जागा देण्यात आली आहे. सदर जागेवर कांबळे यांनी 35 ते 40 फळांची झाडे लावलेली होती. मनपाकडून झाडांच्या सरक्षणासाठी फकत जाळ्या लावलेल्या आहेत. पुढील सुनावणी तारीख 10/4/2024 रोजी आहे. केसचा निकाल लागेपर्यंत स्टे सुर राहील असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच बारा ट्रक सामान साहित्य जप्त केलेल्या वस्तू परत मिळाव्यात व माझ्या बोर्ड प्रमाणे सर्व केस टाकाव्यात.
तसेच निगडी भोसरी रोड ते अंकुश निगडी रोड स्त्याचे संपूर्ण काम न करता तसेच कंपनी लगत गार्डन बाथरूम हे न काढता फक्त मला टार्गेट करून ताबा काढला. यात वहिवाट असणारे व्यवसाय हॉटेल नरसिंह लक्ष्मी, बाबा केटरर्स, हॅप्पी चायनीज, लक्ष्मी ट्रॅव्हल्स ऍण्ड झेरॉक्स, महा ई सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र, भिमालय कार्यालय, लक्ष्मी पान अँड जनरल स्टोअर्स यावर चुकीची बेकायदेशीर कारवाई करण्यात आली होती, सदरची मिळकत हि अतिक्रमित नाही व रोड मध्ये येत नाही. सदर जागेवर महानगरपालिकेने बँक ऑफ बडोदा तर्फे दोन वेळा लोन दिलेले आहे. असे कांबळे यांनी म्हटले आहे.




