कोरोना महामारीला 11 मार्च 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक महामारी घोषित केले होते. या घटनेला आता चार वर्ष उलटू गेली आहेत. सध्या कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी, तज्ञांनी जगात दुसरी महामारी कधीही उद्भवू शकते असा इशारा दिला आहे.
स्काय न्यूजच्या अहवालानुसार, यूकेमधील संसर्गजन्य रोगांचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांनी प्राण्यांपासून मानवांमध्ये विषाणूंचे संक्रमण होण्याच्या आणि दुसऱ्या साथीच्या रोगास कारणीभूत ठरण्याच्या शक्यतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
पुढील महामारी लवकरच धडकण्याची शक्यता आहे. यासाठी दोन, 20 वर्षेही किंवा त्यापेक्षा जास्त काळही लागू शकतो. परंतु आपण यासाठी सावधगिरी बाळगणे थांबवू शकत नाहीत. आपण जागृत, तयार आणि पुन्हा त्याग करण्यास तत्पर राहण्याची गरज आहे, असे मत किंग्ज कॉलेज लंडनमधील संसर्गजन्य रोगांच्या क्लिनिकल लेक्चरर डॉ नॅथली मॅकडरमॉट (Dr Nathalie MacDermott) यांनी व्यक्त केले आहे.




