नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. भाजपने मेरठ लोकसभा मतदारसंघातून रामायण मालिकेतील रामाची भूमिका निभावलेले अरुण गोविल यांना उमेदवारी दिली आहे. तर अभिनेत्री कंगना रणौत हिला हिमाचल प्रदेशमधल्या मंडी लोकसभा मतदारसंघातून लढण्याची संधी दिली आहे.
दिग्गजांचं तिकिट कापलं
भाजपने पाचव्या यादी जाहीर केली असून त्यातून दिग्गजांना नारळ दिल्याचं दिसून येत आहे. वरुण गांधी यांच्याजागी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले जितीन प्रसाद यांना तिकीट दिलं आहे.
तसेच गाझियाबाद मतदारसंघातून दोनवेळा खासदार असलेले व्हीके सिंह यांचं तिकीट कापून अतुल गर्ग यांना दिलं आहे. यादी जाहीर होण्यापू्र्वीच जनरल व्हीके सिंह यांनी सोशल मीडियावर निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती.




