कोलकाता (पश्चिम बंगाल) – केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने आज तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या कोलकाता येथील निवासस्थानांवर छापा टाकला आहे. ‘कॅश फॉर केरी’ प्रकरणात माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर तपास यंत्रणांचे लक्ष आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांच्या सर्व पैलूंची चौकशी करण्याचे आदेश लोकपालने मंगळवारी सीबीआयला दिल्यानंतर सीबीआयने हे छापे टाकले आहेत.
लोकपालने १५ मार्च रोजी सीबीआयला कलम २० (३) (अ) अंतर्गत आरोपांची चौकशी करून सहा महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले होते.
सीबीआयला दर महिन्याला तपासाच्या स्थितीबाबत नियमित स्वरूपात अहवाल सादर करण्याची सूचना लोकपालांच्या यंत्रणेने केली आहे. ‘रेकॉर्डवरील संपूर्ण सामग्रीचे काळजीपूर्वक मूल्यमापन आणि विचार केल्यावर, रिस्पॉन्डंट पब्लिक सव्र्व्हट (आरपीएस) विरुद्ध लावण्यात आलेले आरोप, ज्यापैकी बहुतेक आहेत,




