
भारताची स्टार टेबल-टेनिस खेळाडू मनिका बत्राने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिने साऊदी स्मॅशमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर आता जागतिक क्रमवारीत एकेरीमध्ये २४ वा क्रमांक मिळवला आहे.
ही तिची सर्वोत्तम क्रमवारी आहे. इतकेच नाही, तर जागतिक क्रमवारीत पहिल्या २५ खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला टेबल-टेनिसपटू आहे.
