
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओल हा सध्या त्याच्या आगामी सिनेमांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सनीनं बॉर्डर 2 या चित्रपटाची घोषणा केली. त्यानंतर त्याच्या आणखी एका नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सनीनं सोशल मीडियावर याबाबत नुकतीच एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, “देशातील सर्वात मोठी ॲक्शन फिल्म”
सनीच्या नव्या चित्रपटाचं नाव SDGM असं आहे. त्याच्या या नव्या चित्रपटाचं दिग्दर्शन साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज चित्रपट निर्माते गोपीचंद मालिनेनी हे करणार आहेत. या ॲक्शनपॅक चित्रपटाचा शुभ मुहूर्त काल ठेवण्यात आला होता, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सनी देओलने गुरुवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन त्याच्या SDGM या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाच्या मुहूर्ताचा व्हिडीओही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटाची संपूर्ण टीम आणि दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी दिसत आहेत.
सनीनं सोशल मीडियावर SDGM या चित्रपटाबाबत पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, “देशातील सर्वात मोठी ॲक्शन फिल्म, SDGM. लवकरच शूटिंग सुरु होत आहे.”
चित्रपटाच्या मुहूर्ताच्या कार्यक्रमावेळी सनी देओलसोबत अभिनेत्री सैयामी खेर देखील दिसली. घूमर या चित्रपटामुळे सैयामीला लोकप्रियता मिळाली.अशातच सैयामी SDGM चित्रपटामध्ये सनी देओलसोबत स्क्रिन शेअर करणार आहे, असं म्हटलं जात आहे.
