नवी दिल्ली- हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणात भोले बाबा उर्फ सुरज पाल सिंह याच्याविरोधात पहिला खटला दाखल झाला आहे. शनिवारी सकाळी भोले बाबाने प्रतिक्रिया दिली होती. आपण हाथरस घटनेप्रकरणी दु:खी आहे. चेंगराचेंगरी मृत्यू झालेल्या पीडितांच्या कुटुंबियांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा असं तो म्हणाला होता. त्यानंतर आज त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाल्याचं समोर आलं आहे. इंडिया टूडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
३ जुलै रोजी सरकारने तीन सदस्यीय न्यायालयीन समिती स्थापन केली होती. समितीचे अध्यक्ष हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत. हाथरस प्रकरणात दोषी कोण याबाबत समिती तपास करणार आहे. याआधी सत्संग आयोजित करणारा मुख्य आयोजक देव प्रकाश मधुकर याला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह इतर काही जणांना अटक झाल्याची माहिती आहे. हाथरसमधील चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सूरज पाल सिंह याच्याविरोधात पहिला खटला दाखल झाला झाला आहे. खटला पाटणा कोर्टासमोर लाचणार आहे. सकाळी भोले बाबाने व्हिडिओच्या माध्यामातून संवाद साधला होता. तो म्हणाला होता की, मला सदर घटनेमुळे दु:ख झालं आहे. देव पीडितांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो. सरकार आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा. ज्याने हे घटवलं आहे त्याला सोडण्यात येणार नाही अशी मला आशा आहे.
भोले बाबाचा सत्संग आयोजित करण्यात आला होता. या सत्संगला केवळ ८० हजार लोकांची परावनागी घेण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात २.५ लाखांपेक्षा अधिक लोक आले होते. त्यामुळे जमाव नियंत्रित झाला नाही अन् चेंगराचेंगरी झाली. मुख्य आजोजक केल्या काही दिवसांपासून फरार होता. पोलिसांनी त्याचा पत्ता देणाऱ्याला १ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. अखेर तो जाळ्यात सापडला आहे.




