शेतीला बळकटी आणि शेतकऱ्यांना समृद्धी देणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. योजनेला ६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या १० वर्षात आमच्या प्रयत्नांमुळे देशातील कृषी क्षेत्राचा वेगाने विकास झाला. आमचे प्रयत्न अन्नदात्यांसाठी आदर, समृद्धी आणि नवीन शक्ती देत आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
कृषीमंत्र्यांनी हप्त्याबद्दल माहिती दिली
कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ वा हप्ता जारी करतील, अशी माहिती एक्सवर पोस्ट करून दिली आहे.




