
पीटीआय, नवी दिल्ली
जागतिक पातळीवरअनिश्चिततेचे वातावरण असताना देशांतर्गत आघाडीवर महागाई दराने दिलासा दिला आहे. भाज्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थांच्या भावात घसरण झाल्याने मार्चमध्ये किरकोळ महागाई दरात घसरण होऊन तो ३.३४ टक्क्यांवर आला. गेल्या सहा वर्षांतील ही नीचांकी पातळी आहे. घाऊक महागाईच्या दरातही मार्चमध्ये घसरण नोंदविण्यात आली असून तो सहा महिन्यांच्या नीचांकी पोहोचला आहे.
किरकोळ किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये ३.६१ टक्के होता. मार्चमध्ये यात घसरण होऊन तो ३.३४ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात हा दर ४.८५ टक्के होता. यंदा मार्च महिन्यात किरकोळ महागाईचा दर सहा वर्षांतील नीचांकी पातळीवर आला आहे.
●दुसऱ्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,५७७.६३ वधारून ७६,७३४.८९ पातळीवर स्थिरावला.
●दुसरीकडे शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ५०० अंशांची भर घातली आणि तो २३,३२८.५५ वर बंद झाला. रुपया देखील डॉलरच्या तुलनेत दोन सतार ९१ पैशांनी मजबूत झाला.
●अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवरील अतिरिक्त कर शिथिल केल्यानंतर जागतिक पातळीवर त्याचे सकारात्मक पडसाद उमटल्याने प्रमुख निर्देशांक २ टक्क्यांहून अधिक वधारले.




