
गुजरातच्या अहमदाबाद येथे काही दिवसांपूर्वी एअर इंडियाचे विमान टेक ऑफ केल्याच्या काही मिनिटांतच कोसळल्याची भीषण घटना घडली होती. या दुर्घटनेत २७० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता तर विमानातील अवघा एक प्रवासी बचावला होता. दरम्याच असाच काहीसा भीषण प्रकार अमेरिकेतली ओहायो विमातळावर घडला आहे. येथे देखील उड्डाण केल्याच्या अवघ्या काही मिनिटांतच एक लहान विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत सुट्टीवर निघालेल्या चार जणांच्या कुटुंबासह विमानाचे दोन्ही वैमानिक यांचा मृत्यू झाला आहे. अधिकार्यांनी या दुर्घटनेबद्दल माहिती दिली आहे.
फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, ट्विन-इंजिन Cessna 441 टर्बोप्रोप हे विमान यंगस्टाउन-वॉरेन प्रादेशिक विमानतळ येथे रविवारी सकाळी कोसळले. या दुर्घटनेत विमानातील एकही प्रवासी बचावला नाही अशी माहिती वेस्टर्न रिझर्व्ह पोर्ट अथॉरिटीचे कार्यकारी संचालक अँथनी ट्रेव्हेना यांनी माध्यमांशी बोलताना दिली.हे विमानतळ या संस्थेच्या मालकीचे आहे.
एजन्सीने केलेल्या नोंदीनुसार, विमान हे ओहाओ येथील वॉरेनच्या मिनडर एअर एलएलसीकडे नोंदवण्यात आलेले होते. ट्रम्बल काउंटीचे कोरोनेर लॉरेन्स डीअमिको यांनी सोमवारी पीडितांबद्दल माहिती दिली. यामध्ये पायलट जोसेफ मॅक्सिन (६३), को-पायलट टिमथी ब्लेक (५५) आणि प्रवासी वेरोनिका वेल्लर (६८) त्यांचे पती जेम्स वेल्लर (६७) मुलगा जॉन वेल्लर (३६) आणि त्यांची पत्नी मारिया वेल्लर (३४) यांचा समावेश आहे. ब्लेक आणि इतर प्रवासी हे हब्बार्ड येथील तर मॅक्सिन हे कॅनफिल्ड येथील रहिवासी होते.




